कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्लेवैभव युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट

दुर्गराज रायगडावर जल्लोषात अभिवादन

अलिबाग (राजेश बाष्टे) : संपूर्ण देशवासियांचे आराध्यदैवत, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे शौर्य व पराक्रमाची साक्ष देणारे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत. ‘अद्वितीय वैश्विक मूल्य’ या मान्यतेसह या किल्ल्यांचे जागतिक स्तरावर महत्त्व अधोरेखित झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी किल्ला यांचा समावेश आहे.

या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून रायगड किल्ल्यावर १२ जुलै रोजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. राजसदरपासून लेझीम पथक व पोलीस पथकाने पारंपरिक वाद्यांच्या गजरात होळीचा माळ येथे जाऊन महाराजांना पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन करत पोलीस मानवंदना दिली. तसेच गडावर विविध ठिकाणी आकर्षक रांगोळ्यांनी सजावट करण्यात आली होती.

यावेळी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे, उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) महाड, नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल विभागातील अधिकारी-कर्मचारी, शालेय विद्यार्थी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!