मुख्य बातमीशैक्षणिक

रत्नागिरी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात जागतिक युवा कौशल्य दिन साजरा

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथे असलेले ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रामार्फत १५ जुलै जागतिक युवा कौशल्य दिन साजरा करण्यात आला. यावर्षीची ‘थीम कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर आणि डिजिटल कौशल्याद्वारे युवा वर्गाचे सक्षमीकरण’ अशी होती.

दिनांक ७ ते ११ जुलै ‘ग्रामीण विकास मध्ये समुदाय सहभाग कार्यक्रम’ (कम्युनिटी एंगेजमेंट प्रोग्रॅम इन रूरल डेव्हलपमेंट) या विषया अंतर्गत गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या बी.ए. च्या तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ‘सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे कार्यानुभव कार्यक्रम (हँड्स ऑन ट्रेनिंग) आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी मत्स्य व्यवसाय मधील विविध विषयामध्ये सहभागाद्वारे अनुभव घेतला. विद्यार्थ्यांनी ‘माशांचे बिज गोळा करणे आणि त्यांची वाहतूक करणे, मत्स्यालय व्यवस्थापण, पाण्याची प्रत तपासणी, शोभिवंत माशांचे संवर्धन, जल-पर्यटन, यांसारख्या विषयांमध्ये कामाचा अनुभव घेतला.

विद्यार्थ्यांचा ‘ग्रामीण विकास मध्ये समुदाय सहभाग’ या कार्यानुभव कार्यक्रमाचा निरोप समारंभ १५ जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. यादव, प्रा. श्रावणी विभूते, तसेच सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आणि प्रमुख डॉ. केतन चौधरी तसेच डॉ. आसिफ पागरकर, प्राध्यापक हे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत केल्यानंतर, विद्यार्थ्यांनी त्यांची ओळख आणि कार्यानुभव कार्यक्रम मधून आलेले अनुभव विषद केलेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण डॉ. आसिफ पागारकर यांनी केले.

प्रमुख पाहुण्यांच्या भाषणामध्ये डॉ. यादव यांनी, प्रधान मंत्री मत्स्य संपदा योजना तसेच विविध कौशल्य योजनांचा लाभ घेवून कोकणामध्ये व्यवसाय आणि शेतीमध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन केले. तसेच असे कार्यक्रम भविष्यातही आयोजन करण्याची विनंती केली. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये डॉ. केतन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या विषयामध्ये सखोल प्रशिक्षण घेवून व्यवसायामध्ये उतरण्याचे आवाहन केले. तसेच मत्स्य शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर आणि डिजिटल कौशल्याद्वारे युवा वर्गाचे सक्षमीकरण करणे शक्य असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपूर्वा सावंत यांनी केले. आभार प्रा. सचिन साटम यांनी मानले.

हा कार्यक्रमासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. मकरंद जोशी आणि संशोधन संचालक डॉ. प्रशांत शहारे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. केतन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. डॉ. आसिफ पागारकर, ; अभिरक्षक प्रा. डॉ. हरिष धमगये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्रीमती व्ही. आर. सदावर्ते, श्रीमती ए. एन. सावंत, यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक रमेश सावर्डेकर, मत्स्यालय यांत्रिक मनिश शिंदे, वरिष्ठ लिपिक श्रीमती जे. जे. साळवी, लिपिक सचिन पावसकर, बोट यांत्रिक महेश किल्लेकर, बोटमन दिनेश कुबल, शिपाई सुहास कांबळे व राजेंद्र कडव, मजूर सचिन चव्हाण, क्षेत्र संग्राहक प्रवीण गायकवाड, तेजस जोशी, उल्हास पेडणेकर, प्रशांत पिलणकर, योगेश पिलणकर, स्वप्नील आलीम व अभिजित मयेकर यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!