कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

म्हसळ्यात जंजिरा संस्थानच्या परंपरेनुसार नारळी पौणिमा सण उत्साहात साजरा

म्हसळा (संजय खांबेटे) : रायगड जिल्ह्यातील म्हसळा शहर हे जंजिरा संस्थानमधील महत्त्वाचे बंदर म्हणून पूर्वी ख्यातनाम होते. म्हसळा शहरात कोळी वस्ती नसली तरी नारळी पौर्णिमा सण स्थानिक हिंदू समाज बांधव जैन, मारवाडी, रजपूत, चौधरी या व्यापारी समाजांना विशेष मान देऊन साजरा केला जातो. यंदाही हा सण जंजिरा संस्थानच्या परंपरेनुसार उत्साहात साजरा करण्यात आला.

या सणासाठी प्रशासन प्रतिनिधी म्हणून तहसीलदार, पोलीस ठाणे, नगर पंचायत, पंचायत समिती आणि अन्य मंडळींसह राजपुरीखाडी किनारी संगमावर सनातन संस्कृतीने पूजन, आरती होऊन खाडीला नारळ अर्पण करून दर्या शांत करण्याची प्रथा जंजिरा स्थानच्या सन १९४८ सालच्या हस्तांतराच्या महत्त्वाच्या नोंदीत आहे. त्याच परंपरेनुसार मिरवणूक ढोलताशाचे गजरात वाजत गाजत काढून समुद्राला नारळ अर्पण करण्यात आला

नारळी पौर्णिमा निमित्ताने म्हसळा धावीरदेव महाराज मंदिर ते दिघीरोड समुद्र खाडीपर्यंत मिरवणूक काढून समुद्र किनारी शास्त्री रवी आणि केदार जोशी यांच्या मंत्रोपचारात मनोभावे पुजापाठ आणि महाआरती करून समुद्राला नारळ अर्पण केला यावेळी सुवर्णकार पोतदार कुटुंबीयांकडून खाडीला चांदीचा नारळ अर्पण करण्यात आला.

मिरवणुकीत तहसीलदार सचिन खाडे, गट विकास अधिकारी माधव जाधव, पोलीस निरीक्षक संदीप कहाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठलराव राठोड यांसह अनेक शासकीय आधिकारी, तालुका हिंदु समाज संघटनेचे अध्यक्ष समीर बनकर, म्हसळा हिंदू ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष नंदकुमार गोविलकर, माजी सभापती महादेव पाटील, सचिव महेश पवार, सचिव सुशील यादव, सामाजिक नेते संजय खांबेटे, सुनील उमरोटकर, काका करडे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, दादा पानसरे, गौरव पोतदार, भाई बोरकर, यतीन करडे, स्वप्नील चांदोरकर, सुनील अंजार्लेकर, संतोष कुडेकर, महेंद्र ढवळे, निलेश करडे, सौरभ गोरेगावकर, चेतन जैन, पुजारी म्हशीलकर आदी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!