Uncategorized

गुरव ज्ञाती समाज संस्थेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन  

रत्नागिरी : गुरव ज्ञाती समाज संस्थेच्या नालासोपारा (पालघर) येथे नवीन कार्यालयाचे उद्घाटन कार्यकारिणी सदस्य, विश्वस्त व समाज बंधू-भगिनी यांच्या उपस्थितीत नालासोपारा विभागाचे नगरसेवक श्री. जाधव यांच्या हस्ते नुकतेच श्रीफळ वाढवून करण्यात आले.

मुख्य कार्यालय दादर येथे असून वाशी नवी मुंबई आणि रत्नागिरी शहर ठिकाणी संस्थेच्या इमारती आहेत. आता नवीन कार्यालयाच्या माध्यमातून ज्ञाती संस्थेचे संघटन अधिक मजबूत होणार असून सभासद, कार्यकर्त्यांना एकत्रित येण्यासाठी आणि समाज उपयोगी कार्ययोजना आखण्यासाठी या कार्यालयाची उपलब्धता झाली.

या उद्घाटनप्रसंगी उपस्थित सभासदांना माजी प्रमुख कार्यवाह अनंत गुरव, विद्यमान दलप्रमुख दत्ताराम गुरव संस्थेचे विद्यमान उपाध्यक्ष व गुरव सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष राजन गुरव तसेच प्रमुख कार्यवाह गणपत लाड यांनी संस्थेची सद्य स्थिती, सभासंदांबरोबर असलेली बांधिलकी आणि संस्थेची दूरदृष्टी यावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सर्व व्यवस्था संस्थेचे विद्यमान खजिनदार सुभाष चव्हाण यांनी पाहिली. कार्यक्रमासाठी कमी वेळात व भर पावसात मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिल्याबद्दल सर्व समाज बांधवांचे संस्थेचे विद्यमान अध्यक्ष चंद्रकांत मोरे यांनी आभार मानले व या पुढे असेच सहकार्य करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी विश्वस्त सौ. सुजाता पवार, कार्यकारिणी सदस्य व समाज बांधव मोहित चव्हाण, महेश गुरव, गोविंद (बापू) गुरव, अनिल गुरव, विलास गुरव, अशोक गुरव तसेच संस्थेचे सेवक विलास गुरव, प्रकाश गुरव व इतर कार्यकर्ते आणि सभासद उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!