मुख्य बातमी
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

रत्नागिरी : भारतीय बौद्ध महासभा महिला आघाडीच्या वतीने क्रांतिज्योती माता सावित्रीबाई फुले यांची जयंती आज (३ जानेवारी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे साजरी करण्यात आली.
प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. सावित्री बाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशील पठण करण्यात आले. यावेळी सावित्रीबाईंच्या क्रांतिकारी महान कार्याला उजाळा देणारी भाषणे झाली.
या समयी स्मिता कांबळे, अस्मिता कांबळे, दीपाली जाधव, मानसी तांबे, विनया जाधव, स्वाती कांबळे, समीक्षा जाधब, दीपिका वासनिक, एल. व्ही. पवार, दीपक जाधव, शिवराम कदम, श्री. कांबळे, अभिजीत तांबे, किशोर पवार, अजित जाधव, दिवेन कांबळे, दिलीप वसानिक आदी मान्यवर उपस्थिती लाभली होती.



