आबलोली खालील पागडेवाडी येथे १५ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबीर
प्रकृती फाऊंडेशन, पंचायत समिती गुहागर, लाइफ केएर यांचा स्तुत्य उपक्रम

आबलोली : आरोग्यदक्ष ग्राम उपक्रमांतर्गत प्रकृती फाउंडेशन पंचायत समिती गुहागर, लाइफ केअर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांचे सहकार्याने शनिवारी (१५ मार्च) रोजी सर्वांसाठी एकदिवसीय मोफत कॅन्सर तपासणी, आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी व दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत गुहागर तालुक्यातील आबलोली येथील खालील पागडेवाडी सभागृहात होईल.
या शिबिरात कॅन्सर स्पेशालिस्ट डॉ. नेहा टोपो, जनरल फिजिशियन डॉ. स्वरदा कदम यांच्यासह तज्ञ डॉक्टरांची टीम उपस्थित राहणार आहे. या मोफत शिबिराचा लाभ आबलोली गावासह पंचक्रोशीतील जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोलीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋतुजा गंगावणे यांनी केले आहे.



