मुख्य बातमी

रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई; ३० ग्रॅम हेरॉईनसह चौघांना बेड्या

रत्नागिरी : शहरात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेतंर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरातून ३० ग्रॅम वजनाचा ब्राऊन हेरॉईन सदृष्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रविवारी (दि. ११) सायंकाळी शहर परिसरात गस्त घालत होते. यावेळी जिल्हा रुग्णालय ते निवखोल दरम्यान जाणाऱ्या रस्त्यावर संशयास्पदरित्या आढळलेल्या चौघांची झडती घेतली असता, त्यांच्याकडे अंमली पदार्थ मिळून आले.

या कारवाईत ताहीर रफीक कोतवडेकर (वय ३०, रा. थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी, रिझवान अश्रफ नावडे (रा. राजीवडा, रत्नागिरी, आकीब जिक्रीया वस्ता (रा. राजीवडा, रत्नागिरी) आणि रफत करीम फणसोपकर (रा. राजीवडा, रत्नागिरी) या चौघांना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांनी संशयितांकडून ३० ग्रॅम ब्राऊन हेरॉईन आणि इतर साहित्य असा एकूण ३ लाख ६१ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपींना रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही यशस्वी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, पोलीस हवालदार शांताराम झोरे, विजय आंबेकर, दिपराज पाटील, विवेक रसाळ, योगेश नार्वेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!