आम्ही शेतकरी- कृषीमहाराष्ट्रमुख्य बातमी

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तपदांचा दोघांकडे अतिरिक्त कार्यभार

सागर कुवेसकर वैद्यकीय कारणास्तव रजेवर

मुंबई : सिंधुदुर्ग-मालवण आणि रत्नागिरी येथील सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आला आहे. तसे आदेश मत्स्यव्यवसाय आयुक्त कार्यालयाने १ ऑगस्ट रोजी जारी केले आहे.
या आदेशानुसार, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण, सागर कुवेसकर हे वैद्यकीय कारणास्तव रजेवर आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे सिंधुदुर्गसह असलेला रत्नागिरी जिल्ह्याचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला आहे.
त्यानुसार सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग-मालवण हा अतिरिक्त कार्यभार सिंधुदुर्ग-मालवणचे मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी प्रतिक महाडवाला यांच्याकडे देण्यात आला आहे. तर सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी या पदाचा अतिरिक्त कार्यभार मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी जि. द. सावंत, यांच्याकडे देण्यात आला आहे.
या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या पदाचे काम पाहण्यासोबतच अतिरिक्त कार्यभाराची जबाबदारी पुढील आदेशापर्यंत सांभाळावी असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. श्री. सागर कुवेसकर हे रजेवरून परत येऊन रुजू होताच, ही अतिरिक्त कार्यभार व्यवस्था आपोआप संपुष्टात येईल. हे आदेश तात्काळ अंमलात येणार आहेत असेही या आदेशात म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!