मुख्य बातमी

“बीकेव्हीटीआय”तर्फे खास नवरात्र उपवास स्पेशल पाककला कार्यशाळा यशस्वीपणे संपन्न

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, संचालित रत्नागिरीतील बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इस्टिट्यूटतर्फे (बीकेव्हीटीआय) “नवरात्र उपवास स्पेशल पाककला कार्यशाळे”चे आयोजन २० सप्टेंबर रोजी “बीकेव्हीटीआय”, मारुती मंदिर येथे करण्यात आले होते.

नवरात्राच्या पवित्र महापर्वात, बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इस्टिट्यूटने आयोजित केलेल्या “नवरात्र उपवास स्पेशल पाककला कार्यशाळेला” उत्तम प्रतिसाद मिळाला. विविध वयोगटातील सहभागींनी या कार्यशाळेत सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांना उपवासाच्या वेळी तयार करता येणाऱ्या पौष्टिक व स्वादिष्ट असे ९ पदार्थ शिकवण्यात आले.

या मध्ये उपवासाची चटणी, उपवासाचे पोटॅटो ट्रँगल, उपवासाचे पोटॅटो पॉपकॉर्न, उपवासाचे पोटॅटो स्किन फ्राईज, उपवासाची इडली, साबुदाणा सँडविच / पॅटीस, उपवासाचे पोटॅटो ऑम्लेट, पोटॅटो बटाटा मिक्स भाजी, उपवासाचे फ्रेंच फ्राईज अशा अनेक पारंपरिक रेसिपीज शिकवण्यात आल्या. पाककला तज्ञांनी खास टिप्स व ट्रिक्स दिल्या, ज्यामुळे सहभागी आपल्याला घरीही हे पदार्थ सहज बनवू शकतील.

पाककला तज्ञांनी उपवासाच्या पदार्थांची योग्य निवड आणि ते बनवताना आवश्यक असलेल्या पौष्टिक घटकांची माहिती दिली.

कार्यशाळेतील सहभागींनी आपले अनुभव व्यक्त करताना म्हटले की, “या कार्यशाळेत सहभागी होणे खूपच उत्तम अनुभव होता. नुसत्या पारंपरिक रेसिपीच नाही तर काही नवा आणि अनोखा पदार्थ शिकून आम्ही घरच्यांसाठी त्याची तयारी केली आहे. यामुळे नवरात्री साजरी करत असताना आमच्या आहारात अधिक विविधता आली.”

या कार्यशाळेला बीकेव्हीटीआयचे ट्रॅव्हल टुरिझम आणि हॉस्पिटीलिटीचे प्रशिक्षक प्रसाद शेवडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचा समारोप एक उत्साही आणि आनंदी वातावरणात झाला. बाया कर्वे व्होकेशनल ट्रेनिंग इस्टिट्यूट यांनी या कार्यशाळेचे आयोजन केल्याबद्दल शंभर टक्के यश मिळवले असून, त्यांचा हा उपक्रम नवरात्रीच्या काळात उपवास करणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर ठरला.

“आपण सर्वांनी नवरात्रीच्या पवित्र दिवशी आपली पाककला कौशल्ये विकसित केली. या कार्यशाळेने आपल्याला पारंपरिक रेसिपीज सोबतच नवा दृष्टिकोन देखील दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!