मुख्य बातमी

हातखंबा येथे भरधाव ट्रकने अनेक गाड्यांना उडवले; एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : हातखंबा येथे आज (१७ सप्टेंबर) सायंकाळी भीषण अपघात झाला आहे. कोल्हापूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने अनेक गाड्यांना उडवले. यात तीन ते चार चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचा समावेश आहे. अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. त्यात रत्नागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील विद्यार्थी शिवम गोताड (वय १९) झरेवाडी येथे आपल्या घरी जात असताना या अपघातात ठार झाल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!