मुख्य बातमी

विभागीय स्तरावरील डाक अदालत २५ सप्टेंबरला

रत्नागिरी : येथील अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालयाच्या वतीने २५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता विभागीय स्तरावरील डाक अदालत गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी असलेल्या अधीक्षक डाकघर, रत्नागिरी यांच्या कार्यालयात होणार असल्याचे रत्नागिरीचे डाकघर अधीक्षक यांनी सांगितले.

पोस्टाच्या कामासंबंधीच्या ज्या तक्रारींचे निराकरण झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल. विशेषतः टपाल, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाकवस्तू, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करावा. तसेच तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह केलेला असावा. डाक सेवेबाबतची आपली तक्रार अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी ४१५६१२ यांच्या नावे २२ सप्टेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावी. त्यानंतर आलेल्या तक्रारींचा विचार केला जाणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!