मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

सुमन विद्यालय टेरवची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात प्रथम क्रमांक

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ संचलित न्यू इंग्लिश स्कूल देवरुख आणि सृजन सायन्स सेंटर, देवरुख यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच देवरुख येथे झाले. या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील टेरव सुमन विद्यालयाने माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून नेत्रदीपक यश संपादन केले.

माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात तन्वी प्रदीप सागवेकर व प्रथमेश मनोहर मांडके यांच्या “मल्टीपर्पज वायरलेस अलर्ट सिस्टीम” या उपकरणाला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून या उपकरणाची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी सुमन विद्यालयामार्फत उच्च प्राथमिक गटात विभावरी संतोष वास्कर व हर्ष विजय गावडे यांनी सादर केलेले “वृद्धांचा सोबती” हे उपकरणही प्रदर्शनामध्ये लक्षवेधी ठरले.

५३ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या दिमाखदार पारितोषिक वितरण सोहळ्यात देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत, देवरुख पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विजय परीट, देवरुख पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री. नाईक, श्री. बळवंतराव, श्री. त्रिभुवणे तसेच केंद्रप्रमुख अभिमन्यू शिंदे व शिक्षण विभागाशी निगडित अन्य प्रशासकीय अधिकारी, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे सर्व संचालक, रत्नागिरी जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुदेश कदम, सचिव सुभाष सोकासने व मंडळाचे अन्य संचालक या मान्यवरांच्या उपस्थितीत तन्वी प्रदीप सागवेकर आणि प्रथमेश मनोहर मांडके या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.

या विद्यार्थ्यांना प्रशालेचे विज्ञान शिक्षक अमोल शशिकांत टाकळे व मुख्याध्यापक मंदार प्रभाकर सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.

या जिल्हास्तरीय प्रदर्शनामध्ये प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल यशवंत विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षक यांचे जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विकास कदम, सचिव योगेश कदम, खजिनदार अजित कदम, सर्व संचालक मंडळ, चिपळूण पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक, सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, ग्रामस्थ, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, विद्यार्थी यांनी यशवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील नागपूर येथील राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!