मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत धामणसे ग्रामपंचायतमार्फत कौशल्य विकास प्रशिक्षण

रत्नागिरी : तालुक्यातील धामणसे ग्रामपंचायत आणि राज फाउंडेशन जळगाव यांच्या सयुक्त विद्यमाने १३ नोव्हेंबर रोजी बचत गट आणि युवक-युवतींसाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये मेणबत्ती, अगरबत्ती, धूपबत्ती बनविणे, कागदी व कापडी पिशव्या बनविणे, फिनेल बनविणे, शोभेची कापडी फुले बनविणे आदी प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.

बचत गटातील महिलांना व युवक-युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन अभियान काळात जास्तीत जास्त लखपती दीदी बनविण्याचा निर्णय धामणसे ग्रामपंचायतीने घेतला आहे.

या कार्यक्रमासाठी राज फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गाठे, उपसरपंच सौ. ऋतुजा कुलकर्णी, ग्रामसंघाच्या अध्यक्ष सौ. धनावडे, ग्रामपंचायत सदस्या सौ. जाधव, सौ. स्वरा देसाई, बचत गटाच्या CRP आणि बहुसंख्य बचत गट प्रतिनिधी, युवक, युवती उपस्थित होते.




