स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी व्यवस्थापक विजय पुनसकर यांचे निधन

रत्नागिरी : स्टेट बँक ऑफ इंडिया चे माजी व्यवस्थापक, तेली समाजाचे माजी जिल्हाध्यक्ष तसेच रत्नसागर कबड्डी क्रीडा मंडळाचे माजी कॅप्टन विजय पुनसकर यांचे अल्पशा आजाराने ६ मे रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास परकार हॉस्पिटल येथे निधन झाले. त्यांच्या निधनाने सामाजिक, क्रीडा व बँकिंग क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
विजय पुनसकर हे आपल्या शांत, मनमिळावू आणि सामाजिक कार्यासाठी ओळखले जात होते. त्यांनी तेली समाजाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. तसेच कबड्डी क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत रत्नसागर कबड्डी क्रीडा मंडळाचे कॅप्टन म्हणून जबाबदारी सांभाळली होती. ते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे तालुकाध्यक्ष अॅड. देवेंद्र (बंटी) वणजू यांचे सासरे तर शिंदे सेनेचे शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांचे भावोजी होते. त्यांच्या पश्चात परिवार, नातेवाईक व मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे.



