महाराष्ट्रमुख्य बातमीशैक्षणिक

प्रशांत संभाजी जाधव सनदी लेखापाल (सीए) परीक्षा उत्तीर्ण

मुंबई : सर्वसामान्य मध्यम वर्गीय कुटुंबातील प्रशांत संभाजी जाधव हा सनदी लेखापाल (सीए) परीक्षा उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाला.

दहावी, बारावी व बीकॉम परीक्षेतही त्याने उत्तम गुण प्राप्त केले होते. तसेच अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या सीए परीक्षेतही त्याने घवघवीत यश संपादन केले. विशेष म्हणजे कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना जिद्दीने सीए होण्याचा प्रशांतचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे.

आई-वडिलांचे आशीर्वाद तसेच कठोर परिश्रम, चिकाटी, सातत्य, अथक प्रयत्न या मुळे प्रशांतने हे यश संपादन केले. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रेरणा मित्र मंडळ, रायझिंग सन क्रीडा उत्सव मंडळ, चारकोप कांदिवली, नातेवाईक आणि मित्र मंडळीने सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल प्रशांतचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!