मुख्य बातमी

मुंबईतील नृत्य स्पर्धेत नृत्यार्पण नृत्य अकादमीचे उल्लेखनीय यश

रत्नागिरी : अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघ, नागपूर आणि मेंबर ऑफ इंटरनॅशनल डांस काउन्सिल सीआईडी, पॅरिस यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथे नुकत्याच झालेल्या नृत्य अनुभूती या मुंबई येथील डान्स कॉम्पिटिशन २०२६ या भरतनाट्यम स्पर्धेत रत्नागिरीच्या नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत अकादमीच्या विद्यार्थिनींनी फेस्टिव्हल डान्स, ड्युएट डान्स आणि सोलो डान्स अशा विविध विभागांत सहभाग घेतला.

फेस्टिव्हल डान्सच्या ओपन कॅटेगरीमध्ये सौ. प्रणाली सिद्धेश धुळप यांनी उत्कृष्ट सादरीकरण करत ‘नृत्य विभूषण’ पुरस्कार आणि ‘नृत्य आविष्कार’ पुरस्कार पटकावले.

ड्युएट डान्स – सुपर मॉम कॅटेगरीमध्ये श्रीमती सुप्रिया सूर्यकांत तोडणकर आणि वैभवी वैभव आंब्रे यांनी सहभाग घेत तृतीय क्रमांक मिळवला.

सोलो डान्समध्ये विविध वयोगटांत अकादमीच्या विद्यार्थिनींनी यश मिळवले. मायनर गटात गायत्री स्वप्नील नागवेकर, ओवी ओंकार पांगळे, अनाहिता ए. पाटील आणि देवेशी अमित पांडोळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

ज्युनिअर गटात ओवी मंदार साळवी हिने द्वितीय क्रमांक, तर शुभ्रा गणेश पेजे आणि धनश्री विजय पवार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. दिया जितेंद्र आयरे हिनेही ज्युनिअर गटात तृतीय क्रमांक पटकावला. कस्तुरी निलेश पांगळे हिने चतुर्थ क्रमांक मिळवला.

सिनिअर गटात संस्कृती जितेंद्र भगत हिने द्वितीय क्रमांक, तर भूमिका भरत गुरव हिने तृतीय क्रमांक मिळवला. ओपन कॅटेगरीमध्ये श्रुती सतीश किल्लेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला.

या सर्व यशामुळे नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अकादमीच्या विद्यार्थिनींना गुरु प्रणाली तोडणकर धुळप यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी भरतनाट्यम कलेचे उत्कृष्ट सादरीकरण करत मुंबईतील या स्पर्धेत आपल्या कलेची छाप उमटवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!