पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात तायक्वांदो प्रशिक्षण व स्वसंरक्षण शिबिराची सांगता

राजापूर : तालुक्यातील पडवे येथील पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयात मुलींसाठी तायक्वांदो प्रशिक्षण व स्वसंरक्षण शिबीर नुकतेच पार पडले. या प्रशिक्षण शिबिरामध्ये प्रशालेतील सुमारे १४५ विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
केंद्र शासनाच्या पीएम श्री योजनेअंतर्गत तायक्वांदो व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात आले. गेली ८ वर्ष तालुक्यातील विविध शाळांमध्ये तायक्वांदो व स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणारी संस्था तायक्वांदो अकॅडमी राजापूरचे प्रमुख प्रशिक्षक मुकेश शांताराम नाचरे, महिला प्रशिक्षक श्रुतिका मांडवकर, रिचा मांडवकर, पूर्वा राऊत, गार्गी बाकालकर यांच्यामार्फत नोव्हेंबर ते फेब्रुवारी या दरम्यान देण्यात आले.
प्रशिक्षण शिबिराची सांगता उपप्राचार्य मारूती भेंडवडेकर, वरिष्ठ अध्यापिका सौ. भेंडवडेकर आणि शारीरिक शिक्षिका सौ. शीतल यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्र वितरण करून करण्यात आले. या शिबिरासाठी प्राचार्य श्री. बसवराज यांनी मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षण शिबिरासाठी तायक्वांदो अकॅडमी राजापूरचे अध्यक्ष अभिजीत तेली, उपाध्यक्ष मुकेश मयेकर, कोषाध्यक्ष सौ. मानसी दिवटे, सदस्य संजय मांडवकर, दीपक धालवलकर, संदीप राऊत, अद्वैत अभ्यंकर, निलेश राहटे, दीपिका पवार व सर्व पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.


