मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

लोकनेते स्वर्गीय शामराव पेजे महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक यांची भेट

गुहागर तालुका बळीराज सेनेच्या वतीने स्वागत

आबलोली : गुहागर विधानसभा मतदारसंघातील बळीराज सेनेच्या पदाधिकारी यांनी रत्नागिरी येथे लोकनेते शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापिका श्रीमती पटेल यांची सदिच्छा भेट घेतली. बळीराज सेनेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे कार्यालयात स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हा अध्यक्ष पराग कांबळे गुहागर विधानसभा मतदारसंघ महिला आघाडी अध्यक्षा सौ. ऐश्वर्या कातकर, गुहागर तालुका अध्यक्ष अरुण भुवड, तालुका सचिव ॲड. दिनेश कदम उपस्थित होते. यावेळी ओबीसी बांधवाना मिळणाऱ्या शासनाच्या विविध कर्ज योजनेबाबत श्रीमती पटेल यांनी सखोल माहिती दिली व योजना नागरिकांनी दाद देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

दरम्यान कोकणातील नागरिकांनी व्यवसायात सहभाग घ्यावा व आर्थिक लाभ घ्यावा, असे म्हटले आहे. यावेळी बळीराज सेनेच्या पदाधिकारी यांचे त्यांनी आभार मांडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!