जिल्हास्तरीय पेन्शन अदालत १८ डिसेंबर रोजी

रत्नागिरी : येथील अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालयाच्या वतीने १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता विभागीय डाक कार्यालय रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय पेन्शन अदालत आयोजित केली आहे. त्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करायचे आहेत, अशी माहिती डाकघर अधीक्षक ए. डी. सरंगले यांनी दिली आहे.
यामध्ये सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती वेतनाबाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील. एका व्यक्तीने एकच तक्रार अर्ज करायचा आहे. तक्रारीचा उल्लेख सर्व तपशीलासह करणे गरजेचे आहे. (उदा. तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा आदी)
पेन्शन अदालमध्ये नीतिगत प्रकरण अर्थात उत्तराधिकार आदी आणि नीती प्रकरणांशी संबंधित तक्रारींचा विचार केला जाणार नाही. निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी ज्यांचा ३ महिन्यांच्या आत निपटारा झालेले नाही अशा प्रकारणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल.
आपला अर्ज ए. डी. सरंगले, डाकघर अधीक्षक, विभागीय कार्यालय, रत्नागिरी ४१५६१२ यांच्या नावे १५ डिसेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावा. त्यानंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही.


