मुख्य बातमीसामाजिक

मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपकेंद्र येथे अवयवदान जनजागृती कार्यक्रम

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरी यांच्या वतीने आयोजन

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपकेंद्रात आज (९ एप्रिल) अवयव दान, नेत्रदान, देहदान याबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय रत्नागिरीचे समाजसेवा अधीक्षक रेशम जाधव यांनी मुंबई विद्यापीठ उपकेंद्रातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी – विद्यार्थिनी तसेच स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्रातील उमेदवार यांना अवयवदान, देहदान चे महत्त्व सांगितले. तसेच अवयवदान, नेत्रदान, देहदान याबाबत नागरिकांमध्ये असलेले गैरसमज, अवयवदान, देहदान करण्यासाठीच्या प्रकियेबाबत सविस्तर माहिती दिली.

हा कार्यक्रम मुंबई विद्यापीठ उपकेंद्र रत्नागिरीचे उपकुल सचिव अभिनंदन बोरगावे, सहयोगी प्राध्यापक डॉ. पी. वाय. पाटील, उपकेंद्रातील कर्मचारी व विद्यार्थी/विद्यार्थिनी, तसेच स्पर्धा परीक्षा मागदर्शन केंद्राचे उमेदवार यांच्या उपस्थितीत पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!