मुख्य बातमी

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त रविवारी जय भीम पदयात्रा

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त रविवारी (१३ एप्रिल) सकाळी ७.३० वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडिअम येथून जयभीम पदयात्रेला प्रारंभ होणार आहे. या पदयात्रेचा समारोप जिल्हा शासकीय रुग्णालय समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन होणार आहे. या पदयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

रविवारी निघणाऱ्या जय भीम पदयात्रेमध्ये सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे, एनसीसी, एनएसएस, भारत स्काऊट अँड गाईड, माय भारत व्हॉलेंटिअरमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!