मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागर आगारात प्रथमच महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी

"गुलामगिरी" पुस्तक वितरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

आबलोली (संदेश कदम) : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती रा. प. गुहागर आगाराच्या इतिहासात प्रथमच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झाली.

यावेळी आगार व्यवस्थापक अशोक चव्हाण प्रमुख पाहुणे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार पराग कांबळे यांच्या हस्ते दोन्ही महामानवांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर सर्व अधिकारी व इतर प्रमुख पाहुणे यांचे हस्ते दीप प्रज्वलित करण्यात आले. यानंतर बौद्ध उपासक अनंत जाधव (वरवेली), विशाल सावंत (पाटपन्हाळे) यांच्या वतीने बुद्ध वंदना व भीमस्तुती घेण्यात आली व पूजन झाल्यावर प्रमुख मान्यवारांच्या उपस्थितीत “गुलामगिरी” या पुस्तकाचे वितरण करण्यात आले. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमाला आगार प्रमुख अशोक चव्हाण, पत्रकार पराग कांबळे यांच्यासह स्थानकप्रमुख स्वप्नील शिंदे, वाहतूक नियंत्रक सुनील पवार, मनीष साखरकर, रामा पुंड, रवींद्र घाग, सौ. सुषमा डोंगे, राज्य परिवहन महामंडळाचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यकारणाचे सूत्रसंचालन रामा पुंड यांनी केले. तर आभार प्रदर्शन सूर्यकांत भोसले यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!