मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जगबुडी नदीत (खेड) मॅगीने भरलेला कंटेनर कोसळला

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खेड येथील जगबुडी नदीच्या पुलावर आज (२२ जुलै) सायंकाळी भीषण अपघात झाला. गोव्याहून मुंबईच्या दिशेने निघालेला मॅगीच्या पाकिटांची वाहतूक करणारा कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पुलावरील दोन कठड्याच्या मधून थेट जगबुडी नदीत कोसळला.

सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे जगबुडी नदीची पाणीपातळी वाढली असून, नदी सुमारे ५.१० मीटर पातळीवर वाहत आहे. अशा परिस्थितीत कंटेनर नदीत कोसळताच त्याचे मागील दरवाजे उघडले आणि त्यामधील मॅगीच्या पाकिटांचे बॉक्स आणि कंटेनर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघातानंतर चालकाबाबत उशिरापर्यंत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती. नदीतील पाण्याचा वेग लक्षात घेता प्रशासन, पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून चालकाचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू होते.

घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीवरही परिणाम झाला. अपघाताचे नेमके कारण आणि चालकाची स्थिती याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा असून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!