मुख्य बातमीशैक्षणिक

रा. भा. शिर्के प्रशालेत जागतिक पुस्तक दिनासह इंग्रजी भाषा दिन विविध उपक्रमांनी साजरा

रत्नागिरी : शहरातील रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत जागतिक पुस्तक दिन व इंग्रजी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

शिर्के प्रशालेच्या रंजनमंदिर सभागृहात व ग्रंथालय येथे आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमध्ये प्रशालेच्या पुस्तक प्रदर्शनासह विद्यार्थ्यांकडून इंग्रजी भाषेतील विविध कविता, जिंगल्स, नृत्यासह गाणी, भाषिक वैशिष्ट्यांवर आधारीत विनोद, गंमतीदार कथा यांसह विशेष म्हणजे रविंद्रनाथ टागोर यांची ‘द वेलकम’ नाटिका सादर करण्यात आली.

प्रशालचे प्रभारी मुख्याध्यापक कुमारमंगलम कांबळे यांनी शेक्सपियर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सहय्यक शिक्षक प्रशांत जाधव यांनी लिहिलेले इंग्रजी भाषा गीत विद्यार्थ्यांच्या कडून सादर करण्यात आले. त्यानंतर इंग्लिश लॅंग्वेज लर्निंग क्लबच्या प्रतिनिधींचे कौतुक करण्यात आले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यार्थ्यांना विविध भाषा ज्ञात असणे गरजेचे आहे तसेच ते बाल लेखक, कवी बनणे आवश्यक आहे, अशी क्षमता अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून पूर्ण होवू शकते असा विश्वास मुख्याध्यापक कुमारमंगलम कांबळे यांनी व्यक्त केला. मागील १४ वर्ष यशस्वीरित्या सुरू असलेल्या या उपक्रमाची व्याप्ती आणखी वाढण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी नमूद केले.

इंग्रजी साहित्यात शेक्सपियर यांच्या विविध साहित्य रचनांचे जसे योगदान आहे तसे त्यांनी मोठी शब्दसंपत्ती सुद्धा बहाल केली यामुळेच त्यांचे नाव जगभराच्या साहित्यविश्वात आदराने आणि प्राधान्याने घेतले जाते, असे मत इंग्रजी विभाग प्रमुख प्रशांत जाधव यांनी व्यक्त केले त्याचप्रमाणे प्रथम भारतीय इंग्रजी लेखक म्हणून दीन मुहम्मद यांनादेखील भारतीय इंग्रजी साहित्यात तितकाच सन्मान असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दैनंदिन जीवनात इंग्रजीचा उपयोग जगभर केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांनी व्याकरणाचा उत्तम अभ्यास करावा, असे मत माजी प्रभारी मुख्याध्यापक स्नेहा साखळकर यांनी व्यक्त केले. प्रशालेतून भावी लेखक – कवी घडावेत अशी अपेक्षा पर्यवेक्षिक व जेष्ठ इंग्रजी विषय शिक्षका सौ. पी. एस. जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.

कार्यकमाचे प्रस्ताविक नभा बडे , सूत्रसंचालन प्रांजल सावंत, तर आभार प्रदर्शन अस्मी पाटील या सातवीच्या विद्यार्थिनींनी केले. यावेळी प्रशालेचे जेष्ठ शिक्षक उदय लिंगायत, शैलेंद्र औघडे, शिवाजी पांढरे ग्रंथपाल सौ. चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभाग प्रमुख (सकाळ सत्र) सौ. बापट -सप्रे, इंग्रजी विषय शिक्षक राहुल कांबळे, आर. व्ही. गद्रे, युवराज महाले, जीभाऊ चौधरी यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!