मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दाभोळ समुद्रात एलईडी लाईटचा पुरवठा करणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसायची कारवाई 

दापोली : तालुक्यातील बुरोंडी येथील समुद्रात दुसऱ्या बोटींना एलईडी लाईट पुरवणाऱ्या बोटीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून गुरुवारी (२४ एप्रिल) रात्री कारवाई करण्यात आली आहे. या बोटीवर दोन तांडेल आणि दोन खलाशी सुद्धा आढळून आहे.

राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर अनधिकृत मासेमारी आणि एलईडी मासेमारीवर मत्स्यव्यवसाय विभागाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून मत्स्यविभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी मध्यरात्री म्हणजेच २५ एप्रिल रोजी रोजी रात्री १२ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास बुरोंडी समोर ११.५ सागरी माइल्स मधे मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) हे गस्त घालत होते. यावेळी राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी परवाना असलेली नझीम अली जांभारकर (रा. पडवे, ता. गुहागर, जि. रत्नागिरी) यांची नौका- साबीर, नों. क्र. IND-MH-4-MM-493 द्वारे महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात बुरोंडी समोर अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईटचा वापर करताना पकडण्यात आली. या नौकेवर नौका तांडेलसह २ खलाशी होते.

महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ व सुधारणा अधिनियम २०२१ अंतर्गत एलईडी नौकेवर कारवाई करून ही नौका जप्त करून दाभोळ बंदरात ठेवण्यात आली आहे. त्यावर मासळीचा आढळून आलेली नाही. नौकेवर असणारे लाईट व लाईट पुरवणारी उपकरणे जप्त केली आहेत.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी सागर कुवेस्कर व मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, रत्नागिरी आनंद पालव यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलबजावणी अधिकारी श्रीम. दीप्ती साळवी, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, दाभोळ) सागरी सुरक्षा पर्यवेक्षक, सागरी सुरक्षा रक्षक व गस्ती नौका रामभद्रा वरील कर्मचारी यांच्या सहकार्याने करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!