मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा
आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके विशेष पुरस्काराने सन्मानित
राष्ट्रीय पंचायत राज दिनाचे औचित्य साधून गौरव

आबलोली (संदेश कदम) : पंचायत समिती गुहागर सामान्य प्रशासन विभागामार्फत राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त गुहागर तालुक्यातील खामशेत ग्रामपंचायत येथे पंचायत समिती स्तरावर भव्य दिव्य कार्यक्रमात निर्मल ग्रामपंचायत आबलोलीच्या सरपंच सौ. वैष्णवी वैभव नेटके यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सहाय्यक गटविकास अधिकारी प्रमोद केळस्कर यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे, विस्तार अधिकारी श्री. भांड, खामशेतचे सरपंच मंगेश सोलकर तसेच खामशेत ग्रामपंचायत उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.


