मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

अलोरेतील नवाज शहानूर बाबांच्या ऊर्सामध्ये साहसी खेळांचे आयोजन

चिपळूण : तालुक्यातील अलोरे येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले कोकण के गरीब नवाज शहानूर बाबा (र. अ.) चिश्ती मिनी अजमेर यांंचा उर्स सालाबादप्रमाणे याहीवर्षी सोमवारी (३१ मार्च) साजरा करण्यात येणार आहे.

या उर्स महोत्सवामध्ये संदल, मिरवणूक याबरोबरच दानपट्टा, तलवारबाजी, मर्दानी खेळ इत्यादी साहसी खेळांचे तसेच ऑर्केस्ट्रा झंकार बिट्स अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!