महाराष्ट्रमुख्य बातमी

खंडित झालेला नैऋत्य मान्सून १२ ते १८ जूनदरम्यान पुन्हा सक्रिय

मुंबई : बंगालच्या उपसागरात १० जूनपर्यंत एक चक्रीय प्रणाली तयार होईल. ही प्रणाली आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून पुढे जाऊ शकते. खंडित झालेला नैऋत्य मान्सून १२ ते १८ जूनदरम्यान पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे.

देशातील वातावरण सध्या विचित्र झालं आहे. वेळेआधी मान्सून धडकला खरा मात्र नंतर गायब झाला. मान्सूनचा पाऊस अचानक थांबला आणि विचित्र वातावरण झाले. उत्तर भारतात काही ठिकाणी मुसळधार पावसाने भयंकर महापूर तर काही ठिकाणी हिटवेव सारखी उष्णता वाढली आहे. महाराष्ट्रात तर पाऊस आणि उकाडा असं दोन्ही सुरू आहे. पाऊस गेला की भयंकर घामाच्या धारा लागत आहे.

ज्या मान्सूनच्या आतुरतेने वाट पाहत आहोत, त्याच्याबद्दल एक आशेचा किरण हवामान खात्याकडून समोर आला आहे. २९ मेपासून खंडित झालेला नैऋत्य मान्सून १२ ते १८ जूनदरम्यान पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवला आहे. १२ – १३ जूनदरम्यान पश्चिम बंगालच्या उपसागरात पुन्हा सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती तयार होणार आहे. त्यामुळे याकडे हवामान विभाग याकडे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे अजून थोडा वेळा यासाठी लागू शकतो.

१२ जूननंतर महाराष्ट्रात पुन्हा पाऊस येण्याची शक्यता आहे. मान्सून पुन्हा सक्रिय होऊ शकतो. त्यामुळे आणखी थोडा वेळ मुसळधार पावसासाठी वाट पाहावी लागू शकते. शेतकऱ्यांना पेरणी करू नये असं सांगितलं आहे. जून अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस येईल असा अंदाज आहे. १२ ते १८ जूनदरम्यान मान्सून स्वतःहून गती घेईल.

या कालावधीत मध्य भारत, महाराष्ट्राचे काही भाग आणि दक्षिण भारत जिथे आधीच मान्सून पोहोचलेला आहे तिथे पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मान्सूनची वाटचाल थोडी मंदावली होती. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. पण आता हवामान खात्याने या सगळ्यांना मोठा दिलासा दिला आहे.

मान्सून पुन्हा सक्रीय झाल्यानंतर त्याची पुढची वाटचाल पूर्णतः मान्सूनच्या वाऱ्यांवर अवलंबून असेल असं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार होत असून त्याचा कसा परिणाम होतो ते पाहावे लागणार आहे, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे.

१० जूनपर्यंत बंगालच्या उपसागरात एक चक्रीय प्रणाली तयार होईल. त्यानंतर ४८ तासांत ती संघटित होईल, असं स्कायमेटचे अध्यक्ष जी.पी. शर्मा यांनी स्पष्ट केलं. त्यांच्यानुसार ही प्रणाली आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातून पुढे जाऊ शकते. सध्या भलेही पावसाने थोडा ब्रेक घेतलाय, पण १२ जूननंतर हवामानात मोठा बदल अपेक्षित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!