मुख्य बातमी

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे फिनोलेक्स काॅलेजमध्ये रस्ते सुरक्षा व वाहतूकविषयक व्याख्यान

रत्नागिरी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे फिनोलेक्स अभियांत्रिकी महाविद्यालयात रस्ते सुरक्षा व वाहतूक नियम या विषयावर कायदेविषयक शिक्षण शिबिराचे आयोजन १८ ऑगस्ट रोजी करण्यात आले होते.

या कार्यक्रमात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऋषिकेश कोराने (मोटार वाहन निरीक्षक), जयंत गुरव (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक), मोहसिन अवटी (सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक) उपस्थित होते.

उपप्रादेषिक परिवहन अधिकारी श्री. कोराने यांनी चित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती दिली. श्री. गुरव यांनी अपघात घडल्यानंतर जखमी लोकांना मदत करण्याबाबत गुड समरेटीयनची माहिती विद्यार्थ्यांना दिली. काही विद्यार्थ्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात आले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील यांनी वाहन चालकांनी वाहन चालविताना घ्यावयाची काळजी तसेच सर्व नागरिकांनी रस्त्याचा वापर वाहतुकीव्यतिरिक्त इतर कारणासाठी न करण्याचे आवाहन केले. वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने अपघात घडतात त्यामुळे रस्त्याचा वापर अन्य कारणांसाठी न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!