आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी
नारळ पिकातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना कै. सुनंदा आणि शंकर महादेव भाटकर कल्पवृक्ष मित्र पुरस्कार
पुरस्कारासाठी १३ मेपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : नारळ पिकातील उत्कृष्ट कार्य केले असेल अशा शास्त्रज्ञ, बागायतदार, उद्योजक किंवा कलाकार यांना कै. सुनंदा आणि शंकर महादेव भाटकर कल्पवृक्ष मित्र पुरस्कार देण्यात येणार असून, सन २०२४, सन २०२५ या दोन वर्षातील मानांकनासाठी १३ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्येच्या कृषिविद्यावेत्तांनी केले आहे.
पुरस्कारासाठी उमेदवारांनी, संस्थेने शिफारशीत केलेले अर्ज प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र, भाट्ये, ता. जि. रत्नागिरी यांच्याकडे पाठवावेत. अधिक माहितीसाठी डॉ. किरण मालशे, कृषिविद्यावेत्ता, प्रानासंके भाट्ये (94058586056) यावर संपर्क साधावा.



