मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दहावीच्या निकालावर खेड तालुक्याची छाप; राज्यात तिघे अव्वल

खेड : आज (८ मे) जाहीर झालेल्या दहावीच्या निकालावर कोकण विभागासह खेड तालुक्याने छाप सोडली आहे. तालुक्यातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) संचलित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्यामंदिर शाळेचा विद्यार्थी अनुराग वाघमोडे १०० टक्के गुणांसह राज्यात पहिला, तर वृषभ दिगंबर देवघरकर ९९.६० टक्के गुण मिळवून राज्यात तृतीय, दिशा दिलीप मोहिते ९९.४० टक्के गुण मिळवून राज्यात चौथी आली आहे.

खेड तालुक्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९७.८० टक्के लागला आहे. तालुक्यातून १९६१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी विशेष योग्यते मध्ये ४७३ विद्यार्थी, प्रथम श्रेणी ६९४, द्वितीय श्रेणी ५९५, तृतीय श्रेणीत १५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील ४१ शाळांचा १००% निकाल लागला आहे. त्याचबरोबर तालुक्यातून होडखाड शाळेतून २ विद्यार्थी, शिंगरी हायस्कूल मधून २ विद्यार्थी, कुरवळ जावळी या शाळेतून ५ विद्यार्थी, साखर विद्यालय येथून ५ विद्यार्थी, तसेच तिसंगी हायस्कूल मधून ८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. याही शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेला बसलेल्या शाळा अशा एल. टी. टी. इंग्लिश मीडियम स्कूल, खेड १७८, विद्यार्थी नवभारत हायस्कूल भरणे १६४, विद्यार्थी इंग्लिश मीडियम स्कूल १०९ विद्यार्थी, कविता विनोद सराफ हायस्कूल, लोटे १०२ विद्यार्थी, श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल ९२ विद्यार्थी असे या परिक्षेसाठी बसले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!