मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुरववाडी हितवर्धक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर येथील गुरववाडी हितवर्धक मंडळ पाचेरी आगर या मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक अशा सर्वच क्षेत्रात यशस्वी घौडदौड केली आहे. मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त ७ मे ते ९ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

७ मे रोजी वाडीअंतर्गत क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. ८ मे रोजी सकाळच्या वेळेत मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. दुपारी ३ ते ५ या वेळेत लहान मुले व महिलांसाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार असून, रात्री ८ वाजता रेकॉर्ड डान्स होणार आहेत.

उद्या (९ मे) रोजी सकाळी ११ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा होणार असून, दुपारी १ वाजता महाआरतीचे आयोजन केले आहे. दुपारी ३ वाजता महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभ घेण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता जाहीर सभा आणि रात्री १० वाजता कौटुंबिक तीन अंकी नाटक “परागंदा” या नाटकाचा प्रयोग होणार आहे.

या संपूर्ण कार्यक्रमाचा पाचेरी आगर पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी, भाविकांनी, महिला – पुरुष आणि बालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन या गावचे प्रमुख मार्गदर्शक रामचंद्र हुमणे गुरुजी, गाव प्रमुख अनिल हुमणे, गुरववाडी हितवर्धक मंडळ पाचेरी आगर या मंडळाचे स्थानिक अध्यक्ष संतोष हुमणे, उपाध्यक्ष संदीप गुरव, सेक्रेटरी अंकुश हुमणे, सह सेक्रेटरी दिलीप हुमणे, खजिनदार तुषार हुमणे, सह खजिनदार राजेश हुमणे, मुंबई मंडळाचे अध्यक्ष सुशील हुमणे, उपाध्यक्ष प्रवीण गुरव, सेक्रेटरी नितीन गुरव, सह सेकेटरी प्रशांत हुमणे, खजिनदार राजन हुमणे, सह खजिनदार सुशांत हुमणे, महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सेजल हुमणे, सचिव सौ. सपना हुमणे, खजिनदार सौ. संजना गुरव यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!