मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आबलोलीतील चंद्रकांत बाईत माद्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील आबलोली येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयातील इयत्ता १० वी सन २०२४-२५ चा बोर्डाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

दहावी बोर्डाच्या परीक्षेसाठी या विद्यालयातील एकूण ५१ विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या विद्यालयाने १०० टक्के निकालाची अनेक वर्षांची परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयातून श्रेयस सतीश विचारे आणि तन्वी अनिल मोरे यांनी प्रत्येकी ९८.४० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आले असून, किमया दिनेश नेटके ही ९५ टक्के गुण मिळवून द्वितीय, तर वैष्णवी विकास मेस्त्री ही ९४.६० टक्के गुण मिळवून तृतीय आली. श्रावणी महेश साळवी हिने ९३.४० टक्के गुण मिळवून चौथा, तर आर्या धनदीप साळवी हिने ९०.४० टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकावला.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे लोकशिक्षण मंडळ आबलोली या संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांतशेठ बाईत, कार्याध्यक्ष सचिनशेठ बाईत, मुख्याध्यापक डी. डी. गिरी यांच्यासह शाळा व्यवस्थापन कमिटी पदाधिकारी व सदस्य तसेच शिक्षक, कर्मचारी आणि विविध सामाजिक, धार्मिक संघटनांचे पदाधिकारी यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!