रत्नागिरीतील हॅपी मेडिकेअर थेरपी सेंटरमध्ये कौतुक सोहळा

रत्नागिरी : येथील हॅपी मेडिकेअर थेरपी सेंटर येथे त्रासमुक्त भारत आणि रत्नागिरी तसेच सक्षम भारत आणि रत्नागिरी या अभियानाअंतर्गत सर्वांना मेडिकल जर्नेनियम थेरपी देणाऱ्या कोकण एरिया मॅनेजर प्रभाकर शिंदे यांच्यासह सेविका पूजा मोहिते, रिया गराटे, वैदेही माने, मादिया नाखवा, नजराना रायनी, रोहिणी सावंत, अनुजा महाकाळ आदींचा शाल, श्रीफळ, व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. कामगार दिनाचे औचित्य साधत हा कार्यक्रम घेण्यात आला.
“हॅमी मेडिकल थेरपी हा एक परिवार असून, येथे सर्व धार्मिक सण, सामाजिक उपक्रमही राबविले जातात. आरोग्याच्या द्दष्टीने त्रासमुक्त होण्यासाठी लाभार्थ्यांना जर्नेनियम थेरपीचा मोफत डेमो देण्यात येतो. गेली १२ वर्षे ही सेवा चालू आहे. तसेच नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद ही मिळत आहे,” असे श्री. शिंदे यांनी सांगितले.
या समारंभाला अभिजीत चव्हाण, नेहा चव्हाण, श्रीमती कल्यये, विजय भाटकर, विवेक मोरे, विष्णू बगाडे, श्री. खांडेकर, दतात्रय महाडिक, श्री. संतोष यांच्यासह बहुसंख्य सभासद उपस्थित होते.



