मुख्य बातमीराजकारण
ठाकरे शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्या नूतन जिल्हा पोलिस अधीक्षकांना शुभेच्छा

रत्नागिरी : जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी नुकताच आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
यावेळी रत्नागिरी जिल्हा संघटक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष थेराडे, रत्नागिरी तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, उपतालुकाप्रमुख महेंद्र चव्हाण, विभागप्रमुख मयुरेश पाटील, नयन साळवी, शशिकांत बारगोडे, विभाग संघटक विलास भातडे, उपविभागप्रमुख भाऊ गांगण, सचिन सावंतदेसाई, मनोज कदम, लहुकांत कदम उपस्थित होते.



