प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीलिंबू अंतर्गत उपकेंद्र पुनस येथे क्षयरोगमुक्त भारत अभियान आरोग्य शिबिर

लांजा : तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रअंतर्गत उपकेंद्र पुनस व ग्रामपंचायत पुनस यांच्या संयुक्त विद्यमाने क्षयरोग मुक्त भारत अभियान मोहिमेत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम सरपंच संतोष लिंगायत यांच्या अध्यक्षतेखाली उत्तमरित्या पार पडला.
हे शिबिर जिल्हा परिषदेचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डाॅ. महेंद्र गावडे, लांजा तालुक्याचे आरोग्य अधिकारी डाॅ. प्रशांतकुमार परगे, प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबूचे डाॅ. विवेक कामत, प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबू डॉ. शिवराज नवले यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

यावेळी प्रतिष्ठित नागरिक संतोष साळवी, ग्रामपंचायत अधिकारी पुनस प्रभोध कीर, प्रमोद गुरव, ग्रामपंचायत सदस्य सौ. रश्मी सावंत उपस्थित होते. यावेळी जिल्हा क्षयरोग विभागाचे आरोग्य सहाय्यक मंगेश पाटील, एक्सरे टेक्निशयन निलेश हंगे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे (वाडिलिंबू) आरोग्य निरीक्षक दिलीप गुरव, आरोग्य सहाय्यक शैलेश रेवाळे, प्राथमिक आरोग्य केंद्र वाडिलिंबूच्या आरोग्य सहाय्यक श्रीमती स्नेहल झगडे उपस्थित होते.
एमपीडब्ल्यू सुधीर लिंगायत, एएनएम प्रिती कांबळे, एमपीडब्ल्यू शुभम कांबळे, सुरज सोळंके, श्रीमती क्षितिजा लोखंडे व श्रीमती प्रणाली गोरे यांनी रुग्णांची अत्याधुनिक यंत्राद्वारे तपासणी केली. सर्व आशा ताईंनी, पोस्टमन, अंगणवाडी सेविका यांनी मेहनत घेतली. यावेळी समता फाउंडेशनच्या माध्यमातून डॉ. उगवेकर व नितीश शेट्ये यांनी डोळे व मोतीबिंदू तपासणी केली. तसेच ग्रामस्थांना मोफत चष्म्यांचे वाटप केले.
प्राथमिक आरोग्य केंद्र वाडीलिंबू कार्यक्षेत्रामध्ये आतापर्यंत हर्चे, आगवे, कोट, खानवली आदी ग्रामपंचायतीमध्ये क्षयरोग मुक्त भारत अभियानाचे शिबिर उत्तमरित्या झाले. उर्वरित ग्रामपंचायतीमध्ये लवकरच नियोजन करून क्षयरोग मुक्त भारत अभियान अंतर्गत शिबिर आयोजित करण्याचा मानस आरोग्य निरीक्षक दिलीप गुरव यांनी केला.



