मुख्य बातमी

१६ जूनला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन साजरा होतो. जून महिन्याचा महिला लोकशाही दिन १६ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन समिती यांनी दिली.

लोकशाही दिनाला अर्जदार महिला स्वत: उपस्थित राहून त्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने निवेदन सादर करतात. त्याअनुषंगाने जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांना महिलांचे वैयक्तिक प्रश्नाबाबत कार्यवाहीबाबत निर्देश देण्यात येतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!