दिव्यांग व्यक्ती व संस्था उक्त दिव्यांग सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कारासाठी १५ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या दिव्यांग व्यक्तींकरिता राष्ट्रीय पुरस्कार सन २०२५ साठी नामांकन व अर्ज गृहकामकाज मंत्रालयाच्या केंद्रीकृत पोर्टलवर (www.awards.gov.in) केवळ ऑनलाईन पध्दतीने १५ जुलैपर्यंत मागविण्यात येत आहे. जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्ती व संस्था उक्त दिव्यांग सशक्तीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार २०२५ च्या अनुषंगाने १५ जुलैपर्यंत जास्तीत जास्त अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी केले आहे.
ऑनलाईन पध्दतीने अर्ज/नामांकन मागविण्याच्या दृष्टीने १५ जुलैपर्यंत संकेतस्थळ उघडले असून त्याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे आहे.
अर्ज/नामांकन (www.awards.gov.in) या संकेत स्थळावरून भरण्यात यावी. राष्ट्रीय पुरस्कार २०२५ करिता अर्ज/नामांकने सादर करण्याच्या दृष्टीने १५ जुलै २०२५ या कालावधीसाठी संकेतस्थळ सुरू राहील. राष्ट्रीय पुरस्कार २०२५ करिता अर्ज/नामांकने केवळ गृहमंत्रालयाने तयार केलेल्या (URL. www.awards.gov.in) या ऑनलाईन पोर्टलवर पासवर्ड संरक्षित करून सादर करावा. उक्त पोर्टलवर उपलब्ध असलेल्या विशिष्ट नमुन्यातील अर्जामधील सर्व मुद्द्यांची माहिती उल्लेखनीय व प्रेरणादायी कार्याच्या सविस्तर वर्णनासह भरावी. समक्ष अथवा पोस्टाद्वारे सादर केलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. पात्रता निकष व इतर सविस्तर तपशील नमूद विभागाच्या (www.depwd.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पुरस्कारांसाठींच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विचारात घेण्यात येतील.


