आरोग्यक्रीडामुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जि.प.आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा खोडदे नं. १ येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी चिपळूण तालुक्यातील श्री. शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थांना पाचारण करण्यात आले होते. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रीती गावंडे यांनी सर्वांचे स्वागत केले. यानंतर विद्यार्थी व मान्यवर यांचे योग प्रात्यक्षिक घेण्यात आले.

यावेळी सरपंच पूजा विलास गुरव, ग्रामपंचायत सदस्य नाना साळवी, शिक्षण तज्ञ विलास गुरव, सौ. शर्वरी साळवी, शिक्षिका सौ. संध्या पाटील, शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या महाविद्यालयाचे विद्यार्थी विश्वजित नागेश बर्गे, तेजस रामदास जगताप, आदित्य संतोष सावळे, कुमार बाबाजी उंबरकर, अभय संतोष पवार, महेश संतोष भिडे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्ताने मौलिक मार्गदर्शन केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापिका प्रीती गावंडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!