वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथकरातून सूट
सवलत प्रवेशपत्र उपप्रादेशिक कार्यालयाकडून जारी करण्यात येणार

रत्नागिरी : दिनांक १० जुलैपर्यंत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी पथकरातून सूट देण्यात येणार असून, त्यासाठीचे सवलत प्रवेशपत्र उपप्रादेशिक कार्यालयाकडून जारी करण्यात येणार आहेत. सर्व भाविकांनी व वारकऱ्यांनी यांची नोंद घ्यावी, असे आवाहन सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
आषाढी वारीमधील १० मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावरील सां. बां. विभाग,महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग / राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या पथकर स्थानकांवर मानाच्या पालख्यांना व वारकरी तसेच भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे.
दि. १८ जून ते १० जुलै या कालावधीत पंढरपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या वारकऱ्यांच्या हलक्या व जड वाहनांसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्यांना दि. १८ जून ते १० जुलै या कालावधीसाठी सवलत प्रवेशपत्र जारी करण्यात येणार आहेत. याची सर्व भाविकांनी व वारकऱ्यांनी यांची नोंद घ्यावी,


