मुख्य बातमीशैक्षणिक

के. प. अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात दीप अमावस्या

रत्नागिरी : येथील केशव परशुराम अभ्यंकर मूकबधिर विद्यालयात दीप अमावस्येनिमित्त दीप उजळले. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत नोंद झालेला दापोलीतील सुवर्णदुर्ग किल्ल्याचे चित्र रेखाटून त्याभोवती दीप प्रज्वलित करण्यात आले. विद्यार्थ्यांना दिव्यांचे महत्त्व कळण्यासाठी दरवर्षी असा उपक्रम राबवण्यात येतो.

गुरुवारी सकाळी कलाशिक्षक श्री. वाडिये यांनी सुवर्णदुर्ग किल्ल्याचे चित्र साकारले. त्याभोवती तेलाचे दिवे, पणत्या, मेणबत्त्या, समई लावण्यात आली. विद्यार्थी, पालक प्रतिनिधी आणि शिक्षकांनी दीपप्रज्वलन केले.

या वेळी मुख्याध्यापक गजानन रजपूत यांनी सांगितले की, मूकबधिर विद्यालयात दरवर्षी दीप अमावस्येनिमित्त दीपपूजन केले जाते. दरवर्षी वेगवेगळे चित्र काढून त्या भोवती दीप प्रज्वलित करतो. मराठा लष्करी स्थापत्यकला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट झाला. नव्याने घोषित केलेल्या या जागतिक वारसा स्थळात महाराष्ट्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्यासह ११ किल्ल्यांचा समावेश आहे. यानिमित्त सुवर्णदुर्गचे चित्र रेखाटून त्या भोवती दिवे प्रज्वलित केले आहेत. विद्यार्थ्यांना आज सुवर्णदुर्ग किल्ल्याची माहितीसुद्धा देण्यात आली. सर्वांचे आयुष्य प्रकाशमय होवो, अशा शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!