आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

“विकसित महाराष्ट्र २०४७” क्रीडा प्रेमींनी मत मिळवण्याचे आवाहन

रत्नागिरी : “विकसित महाराष्ट्र २०४७” या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत क्रीडा क्षेत्रातील नागरिकांचे मौल्यवान मत व सूचना जाणून घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत विशेष प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या सूचनांवर आधारित पुढील क्रीडा धोरण तयार करण्यात येणार असून राज्याच्या क्रीडा क्षेत्राला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. अभ्यासक, जास्तीत जास्त नागरिक, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा क्षेत्रातील तसेच क्रीडा प्रेमी यांनी या उपक्रमामध्ये Google Form लिंक : https://forms.gle/d९fcxXWje८AphqpX९ या लिंकमध्ये मत नमूद करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

” विकसित महाराष्ट्र २०४७ ” या राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत क्रीडा क्षेत्रातील नागरिकांचे मौल्यवान मत व सूचना जाणून घेण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत विशेष प्रश्नावली तयार करण्यात आलेली आहे. प्रश्नावली गुगल फॉर्म द्वारे सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या उपक्रमामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व स्तरांतील नागरिक, खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, क्रीडा क्षेत्रातील अभ्यासक, तसेच क्रीडा प्रेमी यांचा सहभाग सुनिश्चित करणे आवश्यक आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!