मुख्य बातमी
जिल्हास्तरीय लोकशाही दिन ५ जानेवारीला

रत्नागिरी : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हास्तरीय लोकशाही दिन साजरा होतो. जानेवारी २०२६ चा लोकशाही दिन ५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी १ ते २ या वेळेत होणार आहे.
लोकशाही दिनासाठी नागरिकांनी प्रथम तालुका लोकशाही दिनात अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. तालुका लोकशाही दिनातील उत्तराने समाधान न झाल्यास जिल्हास्तरीय लोकशाही दिनात अर्जदार अर्ज सादर करू शकतात, असे उपजिल्हाधिकारी (सा.प्र) विश्वजीत गाताडे यांनी कळविले आहे.



