भाजपा गुहागर तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी विजय मसुरकर यांची नियुक्ती

गुहागर (उदय दणदणे) : तालुक्यातील मासू गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते तसेच गुहागर भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते विजय सोनू मसुरकर यांची गुहागर तालुका भाजपा ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.
मसुरकर गेली अनेक वर्षे विविध संस्थांवर कार्यरत असून आजवर त्यांनी ग्राम विकास मंडळ मासू बुद्रुक ग्रामीणचे अध्यक्ष, श्री सालबाईदेवी जीर्णोद्धार समिती (ग्रामीण) मासूचे अध्यक्ष, शीर विविध कार्य.सहकारी सेवा सोसायटी लि.चे व्हाइस चेअरमन, कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका गुहागरचे कार्यकारी सदस्य, गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोलीचे संपर्कप्रमुख, ग्रामपंचायत मासूचे माजी सदस्य, आदर्श शाळा मासू नंबर- १ च्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष, गुहागर तालुका खरेदी विक्री संघाचे माजी संचालक, पंचायत राज व ग्राम विकास सेल भाजपा गुहागरचे माजी अध्यक्ष अशा विविध संस्थांवर कार्यरत राहून आपल्या पदाला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
विजय मसुरकर यांची भाजपा गुहागर तालुका ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.



