मुख्य बातमीराजकारण

शिवबंधन परिक्रमा अंतर्गत उद्या रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची कार्यकारणी बैठक

शिवसेना उपनेते तथा माजी आमदार बाळासाहेब माने व संपर्कप्रमुख सहदेव बेटकर यांची प्रमुख उपस्थिती

रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना उपनेते सुरेंद्रनाथ उर्फ बाळासाहेब माने यांच्या संकल्पनेतून संपूर्ण कोकणात शिवबंधन परिक्रमेच्या पूर्वतयारीसाठी मंगळवारी (२९ जुलै) दुपारी २ वाजता जयेश मंगल कार्यालय, शासकीय विश्रामगृह माळनाका समोर, थिबा पॉईंट रोड, रत्नागिरी येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची रत्नागिरी जिल्हा (दक्षिण) कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, शहरप्रमुख, उपतालुकाप्रमुख, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, शिवसेना महिला आघाडी, युवासेना पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हाप्रमुख (दक्षिण) दत्तात्रय कदम यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!