पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात मुलाखातीमध्ये ५ उमेदवारांची निवड

रत्नागिरी : कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागामार्फत बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” ११ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. या रोजगार मेळाव्यास चांगला प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात मुलाखातीमध्ये ५ उमेदवारांची निवड करण्यात आल्याची माहिती प्र.सहा. आयुक्त मो. ए. दुधाळ यांनी दिली.
या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील गद्रे मरिन प्रा.लि. मिरजोळे, एलआयसी ऑफ इंडिया, जयस्तंभ, रत्नागिरी, एमइएसएएम परशुराम रुग्णालय आणि संशाधन केंद्र, घाणेखुंट (लोटे), स्विग्गी प्रायव्हेट लिमिटेड, जिलानी मरीन प्रोडक्ट, एमआयडीसी मिरजाळे, रत्नागिरी, एम.आय लाईफ स्टाईल ग्लोबल प्रा. लि., स्वराज्य ॲग्रो अँड अलाईड सर्विसेस प्रा. लि., नेक्सलाईफ डाईग्नास्टिक सेंटर अशा नामांकित उद्योजक कंपन्यांनी विविध रिक्त पदांसाठी ७१ उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखत घेवून मुलाखतीमध्ये प्राथमिक २१ उमेदवारांची व अंतिम ५ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.



