ग्रामोद्योग भरारी पुरस्कार अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ जुलै

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे “ग्रामोद्योग भरारी पुरस्कार २०२६” साठी नामांकने मागविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नामांकन अर्ज मंडळाच्या www.mskvib.org या संकेतस्थळावर तसेच खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहेत. इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज २८ जुलै पूर्वी जिल्हा कार्यालयात पाठवावेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, सुमित आडमकर ७७४४००५६९६ (उद्योग पर्यवेक्षक) यांच्याशी संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे.
शासकीय योजनांच्या माध्यमातून विशेष करून ग्रामीण भागात यशस्वी उद्योग उभे करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाने ही पुरस्कार योजना सुरु केली आहे. यंदा या पुरस्काराचे चौथे वर्ष आहे पुरस्कार योजनेत प्रथम, व्दितीय व तृतीय असे तीन पुरस्कार देण्यात येतात व काही उद्योजकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.
उद्योगाच्या वृध्दीसाठी आणि उदयोगाला चालना व गती देण्याच्या संकल्पनेतून सन २०२३ पासून राज्यस्तरीय “ग्रामोद्योग भरारी पुरस्कार” सुरू करून माध्यमातून प्रथम, द्वितीय व तृतीय, उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येत आहेत. मंडळामार्फत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य घेऊन यशस्वीपणे उद्योग उभारणी करून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध केलेल्या मंडळाच्या यशस्वी उद्योजकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे व त्यांचा यथोचित सन्मान व्हावा याकरिता १३ जुलै पासून महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यस्तरीय ग्रामोद्योग भरारी पुरस्कार २०२६ करिता अर्ज मागवण्यात येत आहेत.


