मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हाराजकारण

खेड शहरात रस्त्यांची चाळण

"मनसे" आक्रमक, पालिकेला निवेदन : संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात बसू न देण्याचा इशारा

खेड : नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली खेड शहरातील रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी खेड नगरपालिकेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना ४ ऑगस्ट रोजी निवेदन देण्यात आले. नगरपालिका प्रशासनाने यावर लक्ष केंद्रित न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयात बसून देणार नाही, असा कडक इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देण्यात आला आहे.

खेड नगरपालिकेच्या प्रशासकीय राजवटीला आज साडेतीन वर्षे पूर्ण झाली आहेत; परंतु या साडेतीन वर्षांमध्ये या खेड शहराची बकाल परिस्थिती झाली आहे. याला सर्वस्वी हे नगर प्रशासन जबाबदार आहे. खेड शहरातून जाणार भरणे, साखरोली, वाकवली, दापोली रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. खेड शहरातून जाणाऱ्या रस्त्यामध्ये भलेमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याचे ठेकेदार एसएमसी कन्स्ट्रक्शन असल्याचे समजते आहे; परंतु त्यांची काम करण्याची पद्धत अतिशय बोगस असल्यामुळे पावसाळ्यापूर्वी जी काळजी रस्त्याची घ्यायला पाहिजे होती ती न घेतल्यामुळे आज भरणे-खेड रस्ता धोकादायक स्थितीमध्ये आहे.

या प्रसंगी खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्यासह मनसे तालुकाध्यक्ष निलेश बामणे , खेड शहराध्यक्ष ऋषीकेश कानडे, भालचंद्र (नंदू) साळवी, मनविसे तालुकाध्यक्ष गणेश बेलोसे, स्वरूप माजलेकर, मिलिंद (दादू) नांदगावकर, राहुल पाटणे, प्रदीप भोसले, मनोज दांडेकर, अंकुश शिंदे, प्रदीप भोसले, मनसे प्रसिद्धी माध्यम प्रमुख सर्वेश पवार, प्रशांत बारटक्के यांच्यासह महाराष्ट्र सैनिक, कार्यकर्त, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!