गुहागर हायस्कूलमध्ये आयोजित शालेय वकृत्व स्पर्धेत साकेत गुरव व स्वरा पाटील प्रथम

आबलोली (संदेश कदम) : श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिर गुहागर विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. यानिमित्ताने आयोजित केलेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटामध्ये वक्तृत्व स्पर्धेत प्राथमिक गटात साकेत समीर गुरव (इयत्ता पाचवी), तर माध्यमिक गटात स्वरा मंगेश पाटील (इयत्ता नववी) यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
पाचवी ते सातवी या गटात साकेत समीर गुरव (पाचवी) दुर्वा दशरथ नाटेकर (सातवी), निधी सुनील रांजाणे (सहावी) यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. सान्वी शैलेंद्र खातू (सहावी) हिला उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आला. आठवी ते दहावी या माध्यमिक गटामध्ये स्वरा मंगेश पाटील (नववी) हिने प्रथम, आर्या गणेश झगडे हिने द्वितीय तर सोहम समीर बावधनकर व श्रेयस ज्ञानेश्वर झगडे (आठवी) यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला.
सर्व सुयशस्वी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी शिक्षक पी. बी. जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
सुयशस्वी विद्यार्थ्याचे गुहागर एज्युकेशन सोसायटी व शालेय प्रशासनाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. सौ. यु. पी. कांबळे, सौ. जे. एम. माने, श्री. पी. बी. जाधव व सौ. एस. एस. ठाकूर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.


