मुख्य बातमी
भाट्ये येथे दोन दुचाकींच्या भीषण अपघातात दोघे जखमी

रत्नागिरी : शहराजवळील भाट्ये पुलापासून काही अंतरावर असणाऱ्या चेक पोस्टनजीक दोन दुचाकींची धडक झाली असून, यात दोघेजण गंभीर जखमी झाल्याचे समजते. राज कीर आणि मिलिंद महाडिक (रा. रनपार, ता. रत्नागिरी) अशी जखमी नावे आहेत. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. हा अपघात आज (६ ऑगस्ट) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला.






